राजभवनात नाच रे मोरा, राजभवनाच्या आवारात मोरांचा वावर - peacocks news
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्र राज्याचे राजभवन राज्यपालांना भेटणाऱ्या नेत्यांच्या रीघमुळे चर्चेत असते. एकदा तरी या राज भवन मध्ये फेरफटका मारावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र सध्या राजभवनाच्या परिसरात चक्क मोर बागडताना दिसले. आपण सगळ्यांनी लहानपणी नाच रे मोरा आंब्याच्या वनात या गाण्यावर ताल धरला असेलच. मात्र, मंंगळवारी (दि. 6 जुलै) नाच रे मोरा राजभवनाच्या अंगणात, असे गाणे या मोरांकडे पाहिल्यावर म्हणावेसे वाटेल.