Param Bir Singh Investigation : परमबीर सिंग यांची ठाणे पोलीस ठाण्यात चौकशी सुरू, ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने घेतलेला आढावा - Former Commissioner of Police mumbai

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Nov 26, 2021, 2:09 PM IST

Updated : Nov 26, 2021, 4:49 PM IST

ठाणे - आज सकाळी 10 वाजता सुरू झालेल्या परमबीर सिंग ( Parambir Singh, Former Commissioner of Police mumbai ) यांच्या चौकशीनंतर ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) त्यांना चहा देऊन स्वागत केले आणि चौकशीला सुरुवात झाली. दुपारी सुरू होऊन आता काही तास झालेले आहेत. अशावेळी या गुन्ह्यातील तक्रारदार सोनू जालान ( Sonu Jalan ) यांनी या संपूर्ण प्रकारावर नाराजगी व्यक्त केली. मुळात या प्रकरणाचा तपास व्यवस्थित होत नव्हता. त्यासाठी देखील सोनू जालान यांनी पोलीस महासंचालकांकडे तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर या प्रकरणाचे सरकारी वकील बदलण्यात आले होते. साठ दिवसांच्या कालावधीमध्ये चार्जशीट फाईल न केल्यामुळे या गुन्ह्यातील 29 आरोपीपैकी दोन आरोपींना जामीनही मिळाला आणि आता या प्रकरणाची चौकशी ठाण्यातील एसआयटी प्रमुख असलेले उपायुक्त अविनाश आंबुरे हे करत आहेत. अविनाश अंभोरे हे ठाण्यात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग कार्यरत असताना देखील उपायुक्त असल्यामुळे आता हा तपास कशा रितीने होईल हे सांगता येत नसल्याचे तक्रारदार सांगत आहेत. मात्र, पोलीस खात्याकडून चौकशी सुरू असून आजही या प्रकरणाची तासन्तास चौकशी केली जाणार आहे.
Last Updated : Nov 26, 2021, 4:49 PM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.