पालघर : चक्रीवादळाचा धोका; नागरिकांनी घराबाहेर पडू नये - जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ - palghar collector on cyclone
🎬 Watch Now: Feature Video
पालघर - चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वेग व पाऊस वाढणार आहे. दुपारी भरती येणार असल्याचे हवामान विभागाने कळविले असल्याने पुढील तीन तास महत्त्वाचे आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये म्हणून नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी केले आहे. तसेच कच्च्या घरात असल्यास जिल्हा प्रशासनाने व्यवस्था केलेल्या नजीकच्या शाळेत आश्रय घ्यावा, असेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ म्हणाले आहेत. यासोबत विजेच्या खांबापासून व झाडांपासून नागरिकांनी दूर रहावे, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.