मुंबई : आतापर्यंत महिला सुरक्षेच्या बाबतीत दिल्लीपेक्षा मुंबई कितीतरी पटीनं सेफ आहे, असं म्हटलं जात होतं. मात्र, आता याच्या उलट होताना दिसत आहे. मुंबईत एका रिक्षा चालकानं वीस वर्षे तरुणीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. इतकंच नाही तर, या आरोपीनं पीडित तरुणीच्या गुप्तांगात ब्लेड आणि दगड टाकल्याचं देखील वैद्यकीय तपासात समोर आलं आहे. राजरतन वालवाल असं नराधम रिक्षा चालकाचं नाव आहे. पोलिसांनी या तरुणीची वैद्यकीय तपासणी मुंबईतील केईएम रुग्णालयात केली. त्यात ही बाब समोर आली आहे. या घटनेचा अधिक तपास झोन बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील करत आहेत.
तरुणीवर बलात्कार करुन गुप्तांगात भरले ब्लेड आणि दगडं : मिळालेल्या माहितीनुसार, एक वीस वर्षाची तरुणी रात्री उशिरा राम मंदिर स्थानकाजवळ रडताना काही लोकांनी पाहिली. तिची अवस्था पाहून तिथल्या उपस्थित नागरिकांनी तत्काळ वनराई पोलीस ठाण्यात घटनेबाबतची माहिती दिली. वनराई पोलीस ठाण्याचे कर्मचारी तिथे आले, त्यांनी या तरुणीला सोबत घेतलं. पीडिता आणि तिचं कुटुंब नालासोपारा इथं राहतात. आरोपीनं वसई बीचवर पीडीतेसोबत हे कूकृत्य केल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकानं या तरुणीच्या गुप्तांगात सर्जरी ब्लेड आणि छोटे दगड भरले. या तरुणीला बेशुद्ध अवस्थेत राम मंदिर स्थानकाजवळ सोडून आरोपी रिक्षा चालक पसार झाला.
नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या : दरम्यान, या घटनेचा अधिक तपास झोन बाराच्या पोलीस उपायुक्त स्मिता पाटील करत आहेत. याबाबत बोलताना त्यांनी, "आरोपी रिक्षाचालक राजरतन वालवाल याला ताब्यात घेतलं. रिक्षाचालक राज रतन वालवाल याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल आला असून, या घटनेचा अधिक तपास सुरू आहे," अशी माहिती पोलीस उपायुक्त स्मिता पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा :
- डॉक्टर तरुणी बलात्कार खून प्रकरण : संजय रॉय दोषी असल्याचं न्यायालयानं केलं जाहीर, सोमवारी ठोठावणार शिक्षा
- चिमुकली अत्याचार हत्या प्रकरण : तिघांना ठोकल्या बेड्या, दाढी करून पेहराव बदलताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप
- धक्कादायक : दिराचा वाहिनीवर बलात्कार: पतीही करायचा अनैसर्गिक अत्याचार, पोलीस करणार चौकशी