सेंट किट्स WIW vs BANW 3rd ODI Live Streaming : बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा वनडे सामना आज 24 जानेवारी (शुक्रवार) रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं खेळला जाईल. तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. वेस्ट इंडिजनं पहिला वनडे सामना सहज जिंकला होता, कॅरिबियन महिलांनी 199 धावांचं लक्ष्य 31.4 षटकांत नऊ विकेट्स गमावून पूर्ण केलं होतं. तथापि, दुसऱ्या वनडे सामन्यात बांगलादेशनं 185 धावांचं लक्ष्य सहजपणे राखलं आणि वेस्ट इंडिज सामन्यात 60 धावांनी मागे पडला. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेश महिला संघाचा कॅरिबियन संघाविरुद्धचा हा पहिलाच विजय होता.
A final chance to win the series!🏆
— Windies Cricket (@windiescricket) January 23, 2025
The 3rd CG United ODI bowls off tomorrow!🏏 #WIWvBANW | #MaroonWarriors pic.twitter.com/ntQZoWbdqJ
मालिका सध्या बरोबरीत : सध्या ही मालिका 1-1 नं बरोबरीत असल्यानं तिसरा वनडे सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे कारण दोन्ही संघ मालिका जिंकण्याचा प्रयत्न करतील. या सामन्यात वेस्ट इंडिज फेव्हरिट आहे, परंतु गेल्या सामन्यातील प्रभावी कामगिरीनंतर बांगलादेशलाही त्यांची दावेदारी मजबूत करायची आहे. हेली मॅथ्यूज वेस्ट इंडिजचं नेतृत्व करेल. जर तिनं फलंदाजीनं चांगली कामगिरी केली तर बांगलादेशी गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. दरम्यान, पाहुण्या संघाला ऐतिहासिक मालिका विजय मिळवण्यासाठी सांघिक कामगिरीवर अवलंबून राहावं लागेल.
🎥 Karishma Ramharack | 2nd CG United ODI Press Conference v Bangladesh Women.#WIWvBANW | #MaroonWarriors pic.twitter.com/OLMQ3vkfO5
— Windies Cricket (@windiescricket) January 22, 2025
दोन्ही संघाचा हेड-टू-हेड रेकॉर्ड कसा : वेस्ट इंडिज महिला आणि बांगलादेश महिला क्रिकेट संघांमध्ये आतापर्यंत फक्त 3 आंतरराष्ट्रीय वनडे (WODI) सामने खेळले गेले आहेत. या सामन्यांमध्ये वेस्ट इंडिज महिला संघानं 2 सामने जिंकले आहेत, तर बांगलादेश महिला संघानं एका सामन्यात विजय मिळवला आहे.
Bangladesh Women’s Team Tour of West Indies 2025
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 24, 2025
West Indies vs Bangladesh | 3rd ODI
25 January, 2025 | 12:00 AM (BST) | St. Kitts#BCB #Cricket #Womenscricket #WIWvBANW #Bangladesh pic.twitter.com/fP6Cdnfxtg
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघात तिसरा वनडे सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघातील 3 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा वनडे सामना आज 24 जानेवारी (शुक्रवार) रोजी वॉर्नर पार्क, बासेटेरे, सेंट किट्स इथं भारतीय वेळेनुसार रात्री 11:30 वाजता खेळला जाईल. ज्याची नाणेफेक रात्री 11:00 वाजता होईल.
वेस्ट इंडिज विरुद्ध बांगलादेश महिला क्रिकेट संघातील तिसरा वनडे सामना कुठं आणि कसा पहायचा?
वेस्ट इंडिज महिला आणि बांगलादेश महिला यांच्यातील वनडे मालिकेसाठी टीव्ही ब्रॉडकास्टर उपलब्ध नाही, ज्यामुळं भारतीय चाहते टीव्हीवर या सामन्याचं थेट प्रक्षेपण पाहू शकणार नाही. परंतु या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग फॅनकोड अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
📸 Snaps from the historic first-ever ODI victory by 🇧🇩 Bangladesh Women against West Indies Women on Caribbean soil! 🌴🏏
— Bangladesh Cricket (@BCBtigers) January 22, 2025
PC: WIC#BCB #Cricket #Womenscricket #WIWvBANW #Bangladesh pic.twitter.com/CoEyYM3FZ5
पहिल्या वनडे सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग 11 :
वेस्ट इंडिज : हेली मॅथ्यूज (कर्णधार), कियाना जोसेफ, शेमेन कॅम्पबेले (यष्टीरक्षक), डिएंड्रा डॉटिन, चिनेल हेन्री, आलिया अॅलेन्बी, झैदा जेम्स, मॅंडी मँगरू, अफी फ्लेचर, अश्मिनी मुनिसर, करिश्मा रामहारॅक.
बांगलादेश : शोभना मोस्तारी, मुर्शिदा खातून, निगार सुलताना (यष्टीरक्षक/कर्णधार), शर्मिन अख्तर, शोर्ना अख्तर, जन्नतुल फरदौस, जहांआरा आलम, रितू मोनी, नाहिदा अख्तर, संजिदा अख्तर मेघला, राबेया खान
हेही वाचा :