Side Effects Of Black Coffee: माफक प्रमाणात कॉफी पिणं शरीरासाठी चांगलं आहे. परंतु, कोणत्याही गोष्टीचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते. तसंच कॉफी बद्दल देखील आहे. आपण दिवसभरामध्ये वाटेल तेव्हा कॉफी घेतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच कॉफीचे दिवाने आहेत. अनेकांच्या दिवसाची सुरुवात तर कॉफी घेतल्याशिवाय होत नाही. मात्र, कॉफी घेण्याचे काही दुष्परिणाम देखील आहेत. ब्लॅक कॉफीच्या अतिसेवनानं आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवू शकतात. दररोज एक किंवा दोन कप कॉफी प्यायल्यास काही हरकत नाही. परंतु हृदविकार, चिंता तसंच पचनासंबंधित समस्या असलेल्या लोकांनी कॉफी पिणं टाळलं पाहिजे. जाणून घेऊया ब्लॅक कॉफी पिण्याचे दुष्परिणाम.
- झोपेत अडथळा: कॉफीमध्ये कॅफिनचं प्रमाण जास्त असते. जर्नल ऑफ क्लिनिकल स्लीप मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, यामुळे झोपेमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकते. तसंच निद्रानाशाची समस्या उद्भवते. यामुळे संध्याकाळी कॉफी पिणं टाळावं. तसंच अतिप्रमाणत कॉफीचं सेवन करू नये.
- चिंता: सायकोसोमॅटिक मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, कॅफीनच्या उच्च पातळीमुळे कॉर्टिसॉल सारख्या तणाव संप्रेरकांचे उत्पादन वाढते. यामुळे हृदय गती वाढणे, चिंता आणि अस्वस्थता सारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.
- पाचक समस्या: जास्त कॉफी प्यायल्यानं ॲसिड रिफ्लक्स, छातीत जळजळ, पोटात जळजळ यांसारखे पाचक विकार होऊ शकतात.
- उच्च रक्तदाब: कॅफिनमुळे हृदयाची गती आणि रक्तदाब वाढते. हृदयाची समस्या किंवा उच्च रक्तदाब असलेल्यांनी कॉफी पिणं टाळावं. हे हृदयाशी संबंधित समस्यांतील गुंतागुंत कमी करण्यास मदत करते.
- हाडे कमकुवत: कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाणा जास्त असते. त्याच्या अतिसेवनामुळे हाडांवर परिणाम होतो. कॅफिन कॅल्शियमचे शोषण कमी करू शकते. यामुळे हाडांची ताकद कमी होते आणि हाडं कमकुवत होतात.
- निर्जलीकरण: कॅफिन मूत्र उत्पादन वाढते. त्यामुळे कॉफी प्यायल्याने शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते.
- हृदय धडधडणे: काही व्यक्तींमध्ये, कॉफीच्या अतिसेवनामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात. तसंच काही लोकांचे हृदयाचे ठोके जलद होऊ शकतात.
- कोलेस्टेरॉलची पातळी: फिल्टर न करता तयार केलेल्या कॉफीमध्ये डायटरपेन्स संयुगे उच्च पातळीत असतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. परिणामी हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो.
- गर्भपाताचा धोका: BMJ मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असं निदर्शनात आलं की कॅफिनयुक्त पदार्थ आणि पेय पिल्यास गर्भपाताचा धोका वाढतो. तसंच यामुळे अकाली जन्म देखील होऊ शकतो. त्याचबरोबर बाळाच्या वजनावरही परिणाम होतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC8778943/