ETV Bharat / technology

एअरटेलची लवकरच सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू होणार, स्टारलिंक आणि जिओ कंपनीला आव्हान, गावातही चालणार भन्नाट इंटरनेट - AIRTEL SATELLITE INTERNET SERVICES

भारतातील आघाडीची कंपनी एअरटेलनं देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळं देशातील दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीला चालना मिळणार आहे.

Representative photo
प्रातिनिधिक छायाचित्र (Etv Bharat MH DESK)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 24, 2025, 1:29 PM IST

हैदराबाद : भारतातील टेलिकॉम सेक्टरमध्ये क्रांती होणार आहे. लवकरचं एअरटेल कंपनी देशात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. कंपनीनी सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याची तयारी देखील सुरू केलीय. यामुळं स्टारलिंकसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना आव्हान मिळणार नाही तर देशातील दुर्गम भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटीलाही चालना मिळेल.

सॅटेलाइट इंटरनेट सेवा : एअरटेल भारतात आपली सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्याच्या तयारीत, एअरटेलनं गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आपल्या दोन बेस स्टेशनचं बांधकाम पूर्ण केलं आहे. आता कंपनी स्पेक्ट्रम वाटपाची वाट पाहत आहे. एलोन मस्कची स्टारलिंक देशात आपली सेवा सुरू करण्यापूर्वी एअरटेल सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणार आहे. भारती एंटरप्रायझेसचे उपाध्यक्ष राजन भारती मित्तल यांनी अलीकडेच सांगितलं, की एअरटेलनं गुजरात आणि तामिळनाडूमध्ये आपल्या बेस स्टेशनचं काम पूर्ण केलं आहे.

उपग्रह प्रक्षेपित
सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी कंपनी सरकारकडून हिरवा झेंडा मिळण्याची वाट पाहत आहे. प्रक्षेपण तारीख किंवा वेळेबद्दल विचारलं असता, ते म्हणाले की आवश्यक परवानगी मिळताच, भारतात उपग्रह सेवा सुरू केल्या जातील आणि कंपनीकडून कोणताही विलंब होणार नाही. यासाठी एअरटेलनं आधीच उपग्रह प्रक्षेपित केले आहेत.

स्टारलिंकला स्पर्धा
एअरटेल कंपनी भारतात स्टारलिंकला स्पर्धा देऊ शकतो. स्टारलिंक भारतातही आपल्या सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे, परंतु त्यांना अद्याप सरकारकडून परवानगी मिळालेली नाही. याशिवाय, स्टारलिंकच्या सेवा महाग असण्याची शक्यता आहे, तर एअरटेलनं दुर्गम भागात परवडणाऱ्या दरात सेवा देण्याचं आश्वासन दिलं आहे.

इंट्रा सर्कल रोमिंग सुविधा
याव्यतिरिक्त, सरकारनं अलीकडेच इंट्रा सर्कल रोमिंग (ICR) सुविधा सुरू केली आहे. या अंतर्गत, जिओ, बीएसएन, एल आणि एअरटेल वापरकर्ते आता त्यांचे स्वतःचे सिम सिग्नल नसलं तरीही कोणत्याही उपलब्ध नेटवर्कचा वापर करून कॉल करू शकतात. ही सुविधा दुर्गम भागात नेटवर्क कव्हरेज सुधारण्यास मदत करेल.

काय आहे सॅटेलाइट इंटरनेट सेवा?

सॅटेलाइट इंटरनेट ही एक वायरलेस इंटरनेट सेवा आहे. ही ब्रॉडबँड सेवा पारंपारिक इंटरनेट सेवा उपलब्ध नसलेल्या भागात वापरली जाऊ शकते. यात पृथ्वीवरील डिशला अवकाशातील उपग्रहाकडून सिग्नल प्राप्त होतात. त्यानंतर उपग्रह डिश सिग्नलचं डेटामध्ये रूपांतर करते. डेटा इंटरनेटशी कनेक्ट केलेल्या नेटवर्क ऑपरेशन्स सेंटर (NOC) ला पाठवला जातो. या सेवामुळं दुर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेट सहज मिळवता येतं. ही सेवा हाय-स्पीड इंटरनेट सेवा देखील प्रदान करू शकते. यात डाउनलोड गती 100 Mbps पर्यंत आणि अपलोड गती 3 Mbps पर्यंत मिळू शकते.

हे वाचलंत का :

  1. जिओ आणि एअरटेलचे व्हॉइस ओनली रिचार्ज प्लॅन लॉंच, कोणाचा प्लॅन सर्वात स्वस्त?
  2. रॉयल एनफील्ड स्क्रॅम 440 भारतात लाँच, किंमत, वैशिष्ट्यासह बरेच काही जाणून घ्या...
  3. Realme 14 Pro 5G सीरीजचा पहिला सेल सुरू, फोनच्या खरेदीवर मिळतेय 4000 हजारांची सूट

Conclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.