ETV Bharat / technology

Realme 14 Pro 5G सीरीजचा पहिला सेल सुरू, फोनच्या खरेदीवर मिळतेय 4000 हजारांची सूट - REALME 14 PRO 5G SERIES FIRST SALE

Realme 14 Pro 5G, Realme 14 Pro plus 5G, Realme Buds Wireless 5 ANC चा पहिला सेल सुरू झालाय. फोनच्या खरेदीवर 4000 हजारांची सूट मिळतेय.

Realme 14 Pro 5G
Realme 14 Pro 5G सीरीज (Realme)
author img

By ETV Bharat Tech Team

Published : Jan 24, 2025, 10:49 AM IST

हैदराबाद : रियलमीनं अलीकडेच एक नवीन फोन मालिका लाँच केली आहे. कंपनीनं या मालिकेअंतर्गत दोन फोन लाँच केले आहेत. पहिल्या फोनचं नाव Realme 14 Pro 5G असून दुसऱ्या फोनचं नाव Realme 14 Pro+ 5G आहे. हे दोन्ही फोन 23 जानेवारी 2025 रोजी दुपारी 12 वाजेपासून विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. Realme नं या फोन सीरीजसह Realme Buds Wireless 5 ANC देखील लाँच केलंय, ते देखील विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

Realme 14 Pro 5G किंमत आणि ऑफर्स
कंपनीनं हा Realme फोन दोन प्रकारांमध्ये लाँच केला आहे. पहिला व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत 24,999 रुपये आहे, परंतु त्यावर 2000 रुपयांची लॉन्च ऑफर दिली जात आहे. त्यामुळं वापरकर्ते हा फोन 22,999 रुपयांना खरेदी करू शकतात. या फोनचा दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत 26,999 रुपये आहे, परंतु या फोनवर 2000 रुपयांची लॉन्च डिस्काउंट मिळत आहे, त्यामुळं हा फोन सध्या तो 24,999 रुपयांना खरेदी करता येईल.

Realme 14 Pro+ 5G किंमत आणि ऑफर्स
या फोनचा पहिला व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत 29,999 रुपये आहे, परंतु त्यावर 2000 रुपयांची ऑफर दिली जात आहे. त्यामुळे ग्राहक हा फोन 27,999 रुपयांना खरेदी करू शकतात. या फोनचा दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत 31,999 रुपये आहे, परंतु त्यावर 2000 रुपयांची ऑफर दिली जात असू हा फोन 29,999 रुपयांना खरेदी करता येईल. या फोनचा तिसरा प्रकार 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजसह येतो. या फोनची किंमत 34,999 रुपये आहे. त्यावर 4000 रुपयांची ऑफर दिली जात आहे. त्यामुळं हा फोन तुम्ही 30,999 रुपयांना खरेदी करू शकता.

Realme Buds Wireless 5 ANC किंमत आणि ऑफर्स
या Realme इअरबडची किंमत 1,799रुपये आहे आणि त्यावर 200 रुपयांची लॉन्च ऑफर उपलब्ध आहे. सध्या हे इयरबड्स फक्त 1,599 रुपयांना खरेदी करू शकतात. कंपनीनं ते मिडनाईट ब्लॅक, ट्वायलाइट पर्पल आणि डाउन सिल्व्हर रंगांमध्ये लाँच केलं आहे. वरील सर्व उत्पादनांची विक्री 23 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता सुरू झाली आहे. ग्राहक Realme च्या अधिकृत वेबसाइट आणि Flipkart प्लॅटफॉर्मवरून फोन खरेदी करू शकता.

हे वाचलंत का :

  1. Samsung Galaxy S25 Edge लवकरच लॉंच होणार, कंपनीनं टीझर केला जारी
  2. जागतिक स्तरावर ChatGPT डाऊन, वापरकर्त्यांना आउटेजचा करावा लागतोय सामना
  3. तर..; ग्राहकांचं मोबाइल कनेक्शन बंद केलं जाणार नाही, ट्रायच्या नियमानं ग्राहकांना दिलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.