आढावा उस्मानाबाद विधानसभेचा : राजेनिंबाळकरांना थोपवण्यासाठी पाटील जाणार भाजपत? - उस्मानाबाद विधानसभेचा आढावा
🎬 Watch Now: Feature Video
उस्मानाबाद विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. या मतदार संघावर नेहमीच राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य व माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. गेली ३६ वर्ष त्यांच्या घराण्याची सत्ता याठिकाणी असून सध्या त्यांचे पुत्र राणाजगजीतसिंह पाटील हे तेथील विद्यमान आमदार आहेत. मात्र, सध्या ते भाजपच्या वाटेवर असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.