जनतेची दिभाभूल करणारा अर्थसंकल्प - प्रविण दरेकर - विरोधी पक्ष नेते प्रविन दरेकर यांच्या बद्दल बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - महाविकास आघाडी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प राज्यातील जनेतची दिभाभूल करणारा व फसवा आहे. या अर्थसंकल्पातून सरकारने राज्यातील शेतकरी, आदिवासी, मच्छिमारांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील भौगोलिक समतोल साधलेला नाही. हा केवळ एक-दोन जिल्ह्यासाठी तयार केलेला अर्थसंकल्प असल्याची टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयाची कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करणार व कर्जमुक्तीचे वचन देणारे नेते आता सत्तेत आले. मात्र, त्यांनी आता या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांची सपशेल निराशा केल्याची टीका करताना दरेकर म्हणाले की, ज्या कोकणाने शिवसेनेला जास्त आमदार दिले, ज्या कोकणच्या जनेतने त्यांच्यावर विश्वास टाकला मात्र कोकणाच्या विकासासाठी सुमारे ३ ते ४ हजार कोटीच्या निधीची तरतूद करण्याची आवश्यकता असताना कोकणासाठी तुटपुंजी तरतूद करण्याचे पाप या सरकारने केले. कोकणातील मच्छिमारांनाही महाविकास आघाडी सरकारने अक्षरश वाऱ्यावर सोडल्याचा आरोपही दरेकर यांनी केला.
वरळी येथील दूध डेअरीचा मोकळा भूखंड आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्राच्या नावाखाली लाटण्याचा डाव या महाविकास आघाडी सरकारचा आहे. दुग्ध व्यवसायाला चालना देण्याएवजी हा भूखंड हडपण्याचा प्रकार सरकार करत आहे. अर्थसंकल्पात आदिवासींसाठी कुठलीही नवीन योजना व भरीव तरतूद केलेली नाही. महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ बंद करणाऱ्या या सरकारने राज्यातील जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची कुठलीही नवीन योजना आणली, ना शिक्षणासाठी भरीव तरतूद केली, अशी टीकाही प्रविण दरेकर यांनी केली.