मिनी लॉकडाऊनला नागरिकांचा प्रतिसाद; मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट - Mumbai railway stations lockdown news
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यभरात मिनी लॉकडाऊनची सुरुवात झाली आहेत. मुंबईमध्ये नागरिकांनी प्रतिसाद देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांवर आज सकाळपासून शुकशुकाट दिसून येत आहे. उपनगरीय लोकल सकाळपासून रिकाम्या धावताना दिसत आहेत. राज्य सरकारने फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू ठेवलेली आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांचा आढावा घेतला आहे ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी नितीन बिनेकर यांनी....