ETV Bharat / state

एकनाथ शिंदे यांच्या कारला बॉम्बनं उडवण्याची धमकी : देऊळगाव महीच्या दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या - EKNATH SHINDE BOMB THREAT

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव मही इथून बेड्या ठोकल्या आहेत.

EKNATH SHINDE BOMB THREAT
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारे आरोपी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 21, 2025, 11:25 AM IST

Updated : Feb 21, 2025, 4:07 PM IST

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखा आणि बुलढाणा पोलिसांच्या संयुक्त पथकानं दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मंगेश अच्युतराव वायाळ (35) आणि अभय गजानन शिंगणे (22) या दोघांना पोलिसांनी देऊळगाव मही या गावातून अटक केली आहे. या दोघांनाही घेऊन पोलीस मुंबईला निघाले आहेत. या दोघांवर गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 351(3), 351(4), आणि 353(2) अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

धमकी देणारे दोघे बुलढाणा जिल्ह्यातील : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी गुरुवारी देण्यात आली. याबाबतचा मेल गोरेगाव पोलीस ठाण्यात करण्यात आला. एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. गोरेगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. यावेळी मुंबई पोलीस आणि बुलढाणा पोलीस दलातील जवानांनी मंगेश अच्युतराव वायाळ (35) आणि अभय गजानन शिंगणे (22) या दोघांना गावात जाऊन बेड्या ठोकल्या आहेत.

माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)

दोन्ही आरोपी नात्यानं आहेत आतेभाऊ मामभाऊ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल करून जीवे मारण्याची धमकी देणारे दोन आरोपींना मुंबई एटीएसनं पथकानं कारवाई करत ताब्यात घेतलं. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याची देऊळगाव मही इथं मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. या दोघांनाही दारूचं व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

काय आहे एकनाथ शिंदे धमकी प्रकरण : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची कार बॉम्बनं उडवण्याची धमकी गुरुवारी देण्यात आली. गोरेगाव पोलीस ठाण्यात हा धमकीचा ई-मेल आला. पोलिसांनी ई-मेल पाठणाऱ्यांचा शोध सुरू केला. मुंबईतील इतर पोलीस ठाण्यांमध्येही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल आला. ई-मेलमध्ये एकनाथ शिंदे यांची मोटार बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 351(3), 351(4) व 353 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपींना अटक करण्यात आली असून चौकशीसाठी मुंबईत नेण्यात आलं आहे.

हेही वाचा :

  1. राहुल गांधींकडून महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान, त्यांनी माफी मागितली पाहिजे, एकनाथ शिंदेंची मागणी
  2. मला हलक्यात घेऊ नका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा कोणाला?
  3. नाशिकमध्येही मिशन टायगर; महिनाभरात दहा माजी नगरसेवक शिंदे गटाच्या गळाला

Last Updated : Feb 21, 2025, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.