वालवड गावात नाही स्मशानभूमी, कुटुंबीयांनी मृतदेह आणला तहसीलमध्ये - ETV bhart maharashtra
🎬 Watch Now: Feature Video
पंढरपूर - तालुक्यातील वालवल येथे मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ग्रामपंचायतला हक्काची स्मशानभूमी नसल्याने येथील नागरिक हे आपल्या शेतात मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात. मात्र, येथील भूमीहीन नागरिकांच्या अंत्यसंस्कार करतेवेळी मोठी तारांबळ उडते. मृतदेहावर अंत्यसंकार करण्यासाठी त्यांना शेतकऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. शुक्रवारी अनिता गोकुळ कांबळे यांचे निधन झाले होते. त्यांच्यावर वालवड येथे अंत्यसंस्कार करत असताना त्यांना विरोध करण्यात आला. त्यामुळे मृत महिलेच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट तहसील कार्यालयात आणून आंदोलन केले. यावेळी पोलीस निरीक्षक रामदास शेळके, तहसीलदार सुनिल शेरशाने यांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर मृतदेह गावी नेण्यात आला.
Last Updated : Oct 17, 2021, 8:30 AM IST