अँटिलिया, हिरेन मृत्यू प्रकरणी सहावी गाडी एनआयएने घेतली ताब्यात - मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - अँटिलिया कार स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात अनेक गाड्यांचा सहभाग असल्याचं समोर आलं आहे. आतापर्यंत पाच गाड्या एनआयएनं ताब्यात घेतल्या आहेत. व्होल्वो ही सहावी गाडी ठाणे येथून आज एनआयएनं ताब्यात घेतली आहे. या गाडीला आगोदर एटीएसने ताब्यात घेतलं होतं. पण, तपास एनआयएकडं आल्यानं ठाण्यावरुन ही गाडी एनआयएनं ताब्यात घेतली. आता या गाडीचा संपूर्ण फॉरेन्सिककडून तपासणी केली जाणार आहे.