आपलं ते बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट - नीलम गोऱ्हे - neelam gorhe
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - भाजपचे आमदार अशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नसून मी मदत देणारा मुख्यमंत्री आहे, अशीही टीका केली. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी विना पंचनामा करता पूरग्रस्त भागात मदतीचे पॅकेज का दिले असा प्रश्नही उपस्थित केला होता. यावर नीलिमा गोरे यांनी उत्तर देताना सांगितले की, केंद्र सरकारचे गुजरातवर जास्त प्रेम आहे. गुजरात सरकारला न मागता 1 हजार कोटी रुपये दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारला काहीच नाही. म्हणजे बाब्या आणि दुसऱ्याच ते कार्ट अशी सणसणीत टीका त्यांनी यावेळी केली. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मदत करणाऱ्यांवर टीका करण्यापेक्षा गुजरातमध्येच आपली कृपादृष्टी करणाऱ्या प्रधानमंत्री यांच्याकडून केंद्रामार्फत मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करावा असा टोला लगावला आहे.
Last Updated : Aug 6, 2021, 8:13 AM IST