Amol Mitkari : कालीचरण महाराजसारखी प्रवृत्ती हद्दपार करण्याची गरज : आमदार अमोल मिटकरी
🎬 Watch Now: Feature Video
अकोला - महात्मा गांधींना अभिवादन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आणि आरएसएस यांच्यावर निशाणा साधला ( Amol Mitkari Criticized BJP RSS ) आहे. त्यासोबतच कालीचरण महाराज ( Amol Mitkari On Kalicharan Maharaj ) यांनी धर्म संसदेमध्ये केलेल्या वक्तव्यावरही आक्षेप घेत अशा प्रवृत्तींना हद्दपार करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. गांधी जवाहर पार्क येथे महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी ते आज आले होते. महात्मा गांधी यांचा स्मृती दिवस अर्थात बलिदान दिन ( Mahatma Gandhi Death Anniversary ) . आजच्या दिवशी या देशातला सांस्कृतिक दहशतवादी नथुराम गोडसे यांनी गांधींवर गोळ्या झाडून हत्या केली ( Nathuram Godase Killed Mahatma Gandhi ) होती. आजतागयत तेव्हापासून गांधींवर अनेक आरोप- प्रत्यारोप सातत्याने होतात. कोणाला गांधी नेहरुजींच्याविरुद्ध वाटतात, कोणाला सुभाष चंद्र बोस यांच्या विरुद्ध वाटतात, कोणाला भगतसिंग यांचे विरुद्ध वाटतात. पण महात्मा गांधीचे वेगळेपण हे आहे की योग्य वेळी योग्य ती भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आरएसएसची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढते आहे. कालीचरण महाराज सारखा एखादा वेडा माणूस धर्मसंसदमध्ये काहीतरी बोलून जातो. नथुराम गोडसे जिंदाबाद, महात्मा गांधी मुर्दाबाद नारे लावतो. तर अशी कीड येणार्या काळात आपल्याला ठेचून काढावी लागेल. नव्हे तर ही प्रवृत्ती समाजातून हद्दपार कशी होईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. गांधी कधी मेले नाहीत, गांधीला किती गोळ्या घालून मारण्याचा प्रयत्न केला तरी ते कधीच मरणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली.