घरघुती गॅस दरवाढी विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक.. पुण्यात जोरदार निदर्शने - राष्ट्रवादी लेटेस्ट न्यूज
🎬 Watch Now: Feature Video
पुणे- सततची वाढती महागाई आणि घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्यावतीने केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले. या केंद्र सरकारचं करायचं काय?, खाली डोकं वर पाय’, या घोषणाबाजीने आजूबाजूचा परिसर दणाणून गेला होता. यावेळी महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रसत्यावरच चूल मांडत स्वयंपाक करत सरकारचा निषेध नोंदवला.