मुंबईतील मालाडमधील एका बेकरीतून एनसीबीने जप्त केले अंमली पदार्थ
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - मालाडच्या एका बेकरीतून सुरू असलेल्या अंमली पदार्थ तस्करीचा भांडाफोड करण्यात आला आहे. एनसीबीने या बेकरीतून मारिजुआना पोट केक 830 ग्राम, एडिबल वीड पॉट ब्राउनी आणि एडिबल कैनबिस असे 160 ग्राम मारिजुआना जप्त केले आहे. या कारवाई दरम्यान एनसीबी अधिकाऱ्यांनी ३ जणांना अटक केली असून आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश आहे. केकमध्ये अंमली पदार्थ मिसळून अनेक तरुण याचे व्यसन करत होते. हा एक नवा ट्रेंड ड्रग्ज तस्करांचा समोर आला आहे. याप्रकरणी एनसीबीचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.
Last Updated : Jun 13, 2021, 8:11 PM IST