नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी करवीर निवासिनीची आनंदलहरी रुपात पूजा, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - सगळीकडे नवरात्री सणाची धूम सुरू आहे. राज्यभरातील देवींच्या मंदिरात भाविकांची मांदियाळी लागली आहे. कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरात देखील भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. या नऊ दिवसांमध्ये अंबाबाईची ९ रुपात पूजा बांधण्यात आली आहे. देवीचे हे अनोख रुप डोळ्यात साठवण्यासाठी भाविकांची धडपड सुरू असते. देवीच्या दर्शनासाठी तिसऱ्या दिवशीसुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.
तिसऱ्या दिवशी अंबाबाईची पूजा आनंदलहरी रुपात बांधण्यात आली. जिने उत्तम स्वर्ण अलंकार आणि सूर्यासारखे तेजस्वी मणी शरीरावर परिधान केलेले आहेत. जिने आपल्या हरणासारख्या डोळ्यांनी शिवाला देखील भुरळ पाडली अशा रुपात देवीची पूजा बांधण्यात आली.