पर्थ Virat Kohli Social Media Post : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 22 नोव्हेंबरपासून सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. या सगळ्यामध्ये विराट कोहलीची एक सोशल मीडिया पोस्ट चाहत्यांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. खरंतर 20 नोव्हेंबरला विराटनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर अशी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळं चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढले होते. या पोस्टवर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्सही केल्या.
— Virat Kohli (@imVkohli) November 20, 2024
विराट कोहलीच्या पोस्टमुळं खळबळ : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी विराट कोहलीनं त्याच्या ब्रँडचा प्रचार करण्यासाठी एक पोस्ट केली होती, पण चाहत्यांनी ती कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा म्हणून घेतली. त्याचवेळी विराटनं पत्नी अनुष्का शर्माला घटस्फोट दिल्याचंही काही चाहत्यांना वाटलं. खरंतर, विराटनं पांढऱ्या पार्श्वभूमीवर काही मजकूर असलेली एक पोस्ट शेअर केली, जी पाहून लोकांमध्ये गैरसमज वाढू लागले आहेत. आम्ही तुम्हाला सांगतो की, विराटनं जेव्हा कसोटी फॉर्मेटचं कर्णधारपद सोडलं तेव्हा त्यानं सोशल मीडियावर केवळ पांढऱ्या पार्श्वभूमीवर मजकूर लिहून घोषणा केली होती.
काय लिहिलं पोस्टमध्ये : विराटनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, 'जेव्हा आपण मागं वळून पाहतो तेव्हा आपल्याला दिसून येतं की आपण नेहमी इतरांपेक्षा थोडे वेगळे आहोत. आम्हाला बसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही बॉक्समध्ये आम्ही कधीही बसलो नाही. दोन मिसफिट्स फक्त एकमेकांकडे आकर्षित झाले. आम्ही काळानुसार बदलत राहिलो, पण नेहमी आमच्या पद्धतीनं गोष्टी केल्या. काही लोकांनी आम्हाला वेडा म्हटलं, तर अनेकांना काही समजलं नाही. पण प्रामाणिकपणे, आम्हाला त्याची पर्वा नव्हती. दहा वर्षांचे चढ-उतार आणि कोरोना महामारीही आपल्याला हादरवू शकली नाही. आम्हाला कोणी वेगळे वाटले असेल तर ते आमचं बलस्थान होतं.
Retirement before BGT 💔
— Div🦁 (@div_yumm) November 20, 2024
At this rate people might mistake your actual retirement post to be another ad in future...change your manager/font/background bro 😭
— Johns (@JohnyBravo183) November 20, 2024
Please stop using this white post 😭🙏
— 𝐑𝐢𝐭𝐢𝐤𝐚ᥫ᭡ (@ritz__thoughts) November 20, 2024
My heartbeat accelerate everytime
चाहत्यांनी पोस्टवर केल्या अशा कमेंट्स : चाहत्यांनी विराट कोहलीची ही पोस्ट पूर्णपणे वाचली नाही आणि कमेंट करायला सुरुवात केली. एका यूजरनं लिहिलं की, 'बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीपूर्वी निवृत्ती'. एका चाहत्यानं लिहिलं, 'मला मिनी हार्ट अटॅक दिला.' दुसऱ्या वापरकर्त्यानं लिहिलं, 'या प्रकारे लोक तुमच्या रिटायरमेंट पोस्टला प्रमोशनल पोस्ट मानतील, तुमचा मॅनेजर/फॉन्ट/पार्श्वभूमी बदला.'
हेही वाचा :