अकोला : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 288 जागांवर मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. चार हजारांहून अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे. तर राज्यात सुरू असलेल्या मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुपारी तीन वाजतापर्यंत राज्यात 45.53 टक्के मतदान झालं आहे.
प्रकाश आंबेडकरांनी बजावला मतदानाचा हक्क : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पत्नी अंजली आंबेडकर यांच्यासह अकोल्यातील पोदार शाळेत मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन देखील केलं. "तुम्ही ज्या विचारांवर चालत असाल अशांना मतदान करा, अन्यथा आयाराम-गयाराम सारखी सत्ता बसेल", असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
"या विधानसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षाचे प्राबल्य वाढेल.राष्ट्रीय पक्षांचा बोलबाला या निवडणुकीत संपेल. वंचित बहुजन आघाडीच्या जास्तीत जागा याव्यात अशी आमची इच्छा आहे. ज्या विचारधारेला आपण मानतो, त्या विचारधारेला मतदान करावं. आयाराम-गयाराम यांचं सरकार येण्यापेक्षा विचारधारेचं सरकार यावं". - प्रकाश आंबेडकर, अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी
यांनी बजावला मतदानाचा हक्क : आज महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची जोरदार चर्चा आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक भागामध्ये मतदान होतंय. लोक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावून उभे आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी सहकुटुंब मतदान केलं. मतदान केल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींसोबत संवाद साधला.
हेही वाचा -