ETV Bharat / state

मतदान सक्ती कायदा करण्याची गरज, रामदास आठवले संसदेत आवाज उठवणार

मतदान सक्ती करण्यासाठी कायदा करण्याची गरज असल्याचे मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलंय. तसेच आठवले मतदान सक्ती कायदा करण्यासाठी संसदेत आवाज उठवणार असल्याचं सांगितलं जातंय.

Ramdas Athawale
रामदास आठवले (ETV Bharat File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

मुंबई - कमी मतदानाचे चित्र बदलण्यासाठी मतदान सक्ती करणारा कायदा करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलीय. रामदास आठवले यांनी वांद्रे पूर्वकडील गांधीनगर येथे सहकुटुंब मतदान केलंय. पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत आठवले यांच्यासह मतदान केलंय. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे, मतदारांनी सुट्टी घ्यावी अन् मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केलंय.

मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका: लोकशाही सृद्ढ होण्यासाठी मतदानाचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. 80 ते 90 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होणे गरजेचे आहे. मात्र, मतदान 50 टक्के किंवा त्या दरम्यान होत असल्याने मतदानाची कमी टक्केवारी ही लोकशाहीसाठी शोकांतिका असल्याची खंत त्यांनी व्यक्त केलीय. मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही आठवले यांनी व्यक्त केलेय.

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंसोबत साधलेला संवाद (ETV Bharat Reporter)

मतदान करा आणि मग जा आपल्या घरा : मतदान केंद्रावर गर्दी होऊ नये, यासाठी बुथची संख्या वाढवावी आणि हजार मतदारांऐवजी एका बुथवर 500 मतदारांची व्यवस्था करण्यात यावी, यासाठी आपण निवडणूक आयोगाला पत्र लिहिणार असल्याचंही रामदास आठवले यांनी सांगितलंय. 'मतदान करा व मग जा आपल्या घरा' असे आवाहन त्यांनी मतदारांना केलंय. सरकारने केलेल्या कामामुळे महायुतीला 165 जागांवर विजय मिळेल आणि महायुतीला स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

तावडे यांच्यावरील आरोप पूर्णत: चुकीचे : भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावरील आरोप पूर्णत: चुकीचे आहेत. बहुजन विकास आघाडीचा उमेदवार पराभूत होणार असल्यानं तशा पद्धतीची वातावरण निर्मिती करून हा प्रकार केलाय. विनोद तावडेंना बदनाम करण्याचा हा प्रकार असून, जाणीवपूर्वक त्यांना फसवण्याचा प्रकार असल्याचे रामदास आठवले म्हणालेत. मात्र त्यांनी पैसेवाटप केलेले नाही, असा दावाही रामदास आठवलेंनी केलाय. भाजपाने राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात झालेल्या आरोपांची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आठवले यांनी केलीय. यावेळी रामदास आठवलेंनी एक चारोळी केलीय. "माझे नाव रामदास, मला आहे विजयाचा विश्वास, मला महाराष्ट्राची आहे आस, या निवडणुकीत महाविकास आघाडीचा होईल नाश", असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागलंय.

हेही वाचा :

  1. न्यूझीलंडविरुद्ध मालिका जिंकणाऱ्या कर्णधाराला संघात स्थान नाही; नव्या कर्णधारासह श्रीलंका संघाची घोषणा
  2. असं कसं! खेळपट्टीवर घालवले 2 तास, 77 चेंडू खेळून झिरोवर आऊट, तरीही ठरला सामन्याचा 'हिरो'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.