ETV Bharat / entertainment

सलीम खान, हेमा मालिनी, श्रद्धा कपूर, राकेश रोशनसह सेलेब्रिटींनी केलं मुंबईत मतदान - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी सेलेब्रिटी मुंबईत मतदान करताना दिसले. पद्मिनी कोल्हापूरे, सलीम खान, हेमा मालिनी, श्रद्धा कपूर, राकेश रोशनसह सेलेब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra Assembly Election
विधानसभेसाठी सेलेब्रिटींचं मतदान (ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 20, 2024, 4:47 PM IST

मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी राज्यभर मोठ्या उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपार 3 वाजेपर्यंत महाराष्ट्रात 45. 53 टक्के इतकं मतदान पार पडलंय. मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर बॉलिवूडमधील सेलेब्रिटी आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसले. यामध्ये बॉलिवूड आयकॉन सलमान खानचे वडील सलीम खान हे मुंबईत मतदान करण्यासाठी बाहेर पडलेल्या प्रमुख व्यक्तींपैकी एक होते. रणबीर कपूर, शंकर महादेवन, रकुल प्रीत सिंग, जॅकी भगनानी यासारख्या सेलेब्रिटींनीही मतदान केलं.

Maharashtra Assembly Election
पद्मी कोल्हापूरेसह श्रद्धा कपूर (ANI)

त्यांची पत्नी, सलमा खान यांच्यासमवेत, ज्येष्ठ पटकथालेखक सलीम खान बुधवारी दुपारी मतदान केंद्रापर्यंत पोहोचले. यावेळी सुरक्षारक्षकांनी त्याच्याभोवती कडे केले होते.

Maharashtra Assembly Election
सलीम खान (ANI)

मतदानानंतर अभिनेता सोहेल खान म्हणाला, "मी वांद्र्याचा मुलगा आहे... जो कोणी जिंकेल त्याला वांद्रे आवडेल अशी मी आशा करतो तसेच वांद्रेकरांनाही तो आवडेल. चांगले राजकारणी जिंकतील अशी मला खात्री आहे. मतदान करणं ही आपली जबाबदारी आहे, त्यामुळे प्रत्येकाला मतदान करण्याची मी विनंती करतो."

Maharashtra Assembly Election
सोहेल खान (ANI)
Maharashtra Assembly Election
हेमा मालिनी आणि ईशा (ANI)

भाजपा खासदार असलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांची मुलगी, अभिनेत्री ईशा देओल, मुंबईतील जमनाबाई इंटरनॅशनल स्कूल मतदान केंद्रावर दिसल्या. या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केले. हेमा मालिनी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, मतदारांना बाहेर पडण्यासाठी आणि त्यांचे नागरी कर्तव्य पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहित केले. त्या म्हणाल्या, "मी मतदान करण्यासाठी इथे आले आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करते की बाहेर या आणि मतदान करा. देशाच्या भविष्यासाठी मतदान करणे हे तुमचे कर्तव्य आहे."

Maharashtra Assembly Election
राकेश रोशन (ANI)

ईशा पुढे म्हणाली, "मी आज मतदान करण्यासाठी येथे आहे आणि मला वाटते की प्रत्येकाने बाहेर पडणे महत्त्वाचे आहे. प्रत्येकाचे मतदान केंद्र त्यांच्या घराजवळ असते. त्यामुळे नंतर बसून रडण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तुम्हाला थोडा वेळ काढण्याची गरज आहे."

Maharashtra Assembly Election
ट्विंकल खन्ना (ANI)

चित्रपट निर्माते राकेश रोशन यांनीही त्याच मतदान केंद्रावर मतदान केले.अभिनेत्री श्रद्धा कपूर, तिचा भाऊ सिद्धांत कपूर आणि तिची मावशी पद्मिनी कोल्हापुरेबरोबर मुंबईतील एका मतदान केंद्रावर पोहोचली. फ्लोरल प्रिंट सूट परिधान करून, श्रद्धाने तिच्या कुटुंबासह फोटोसाठी पोज दिली आणि अभिमानाने तिचे शाईचे बोट दाखवले. अभिनेता अर्जुन कपूरनेही आपले मतदान केले. त्याची बहीण अंशुला कपूरही याच बूथवर मतदान करताना दिसली.बॉलिवूड सेलिब्रिटींच्या यादीत लेखिका आणि अभिनेत्री ट्विंकल खन्ना सामील झाली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.