Nagar Panchayat Election Result : मानोरा नगरपंचायतवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व.. 17 पैकी 14 जागांवर विजयी - मानोरा नगरपंचायत निवडणूक निकाल
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-14229682-764-14229682-1642602666027.jpg)
वाशिम जिल्ह्यातील मानोरा नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसने 17 पैकी 14 जागांवर विजय मिळवल्यामुळे नगर पंचायतवर एकहाती सत्ता मिळवली आहे. तर काँग्रेस 2 जागा भाजप एक तर शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीला खातेही उघडता आले नाही. विशेष म्हणजे याआधी मानोरा नगर पंचायतवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत 17 पैकी 14 जागा जिंकल्यामुळे एक नंबरचा पक्ष ठरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस तळागाळातील लोकांसाठी काम करीत असल्यामुळे मानोरा नगर पंचायतवर निर्विवाद वर्चस्व मिळवले असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते तथा निवडून आलेले नगरसेवक हेंमद्र ठाकरे यांनी व्यक्त केले.