VIDEO - खासदार सुप्रिया सुळे वाढदिवस : राष्ट्रवादीकडून अनाथ मुलांना दत्तक घेण्याचा अभिनव उपक्रम - राष्ट्रवादी अनाथ मुलांना दत्तक घेणार
🎬 Watch Now: Feature Video

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त (30 जून) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाशिक जिल्ह्यात कोरोनामुळे आई-वडिल गमावून अनाथ झालेल्या बालकांना दत्तक घेण्याचा संकल्प करण्यात आला. त्याची सुरुवातही दिंडोरी तालुक्यातील कुर्णोली या गावापासून करण्यात आली.
कुर्णोली येथील कावेरी व कृष्णा या मुलांनी नुकतेच आपले आई-वडिल गमावले. त्यांच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सपकाळ फाऊंडेशनचे रविंद्र सपकाळ यांनी उचलला आहे. तसेच कसमादे प्रोड्युसर अॅग्रोचे संचालक गणेश पवार यांच्यावतीनेही २५००० रूपयांचा धनादेश कावेरी-कृष्णाला देण्यात आला. यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. योगेश गोसावी यांनी निराधार झालेल्या कावेरी व कृष्णा संधान यांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली. दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरूषोत्तम कडलग यावेळी उपस्थितीत होते.