मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत बीडीडी चाळ पुनर्विकास सर्व्हेक्षणासंदर्भात निर्णय होणार - राहुल शेवाळे - bdd chawl raju waghmare news
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-11882114-thumbnail-3x2-k.jpg)
मुंबई - नायगाव येथील बीडीडी चाळच्या पुर्नविकास सर्वेक्षणादरम्यान गदारोळ झाला. आधी करार करा, मग सर्वेक्षण करा, अशी मागणी स्थानकांनी केली. त्यानंतर म्हाडा, पीडब्ल्यूडी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीत सर्वेक्षण थांबण्यावर एकमत झाल्यानंतर हा गोंधळ थांबला. लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन यातील त्रुटी समजावून सांगत निर्णय घेतला जाईल, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले. यावेळी आमदार कालिदास कोळंबकर, काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे आणि स्थानिक नगरसेविका उर्मिला पांचाळ या उपस्थित होत्या.