वाट्टेल ती किंमत मोजून मराठा समाजाला आरक्षण देऊ - हसन मुश्रीफ - minister hasan mushrif on maratha
🎬 Watch Now: Feature Video
कोल्हापूर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी कोल्हापुरात खासदरा संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाट्टेल ती किंमत मोजू पण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय सरकार स्वस्थ बसणार नसल्याचे मत व्यक्त केले आहे. तसेच मराठा समाजाचे इतर प्रश्नही मार्गी लावण्याबरोबरच न्यायालयीन लढाई लढून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करू, त्यासाठी मराठा समाजाने थोडा वेळ द्यावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी या आंदोलनात बोलताना केले आहे.