केंद्राची शेतकऱ्यांविरुद्ध 'दंगल'; राज्यमंत्री बच्चू कडूंची यांची टीका - बच्चू कडू लखीमपूर प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
अमरावती - देशामध्ये यापूर्वी धर्म आणि जातीच्या नावावर दंगली झाल्या आहेत. आता मात्र शेतकऱ्यांविरुद्ध दंगली घडविण्याचा कट केंद्र शासन जाणीवपूर्वक घडवत असल्याचा आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. लखीमपूर खीरीमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हत्येनंतर ही बाब स्पष्ट झाली आहे असे म्हणत शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या अराजकतेचा वचपा काढावा, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आईच. तसेच लखीमपूर खीरीमध्ये बळी पडलेल्या शेतकऱ्यांची भेट घेणार असल्याचे मत राजमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.