VIDEO :...अन् बच्चू कडूंना आवरला नाही कबड्डी खेळण्याचा मोह - कबड्डी
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-12924906-thumbnail-3x2-kasu.jpg)
अमरावती - राज्यमंत्री बच्चू कडू महाराष्ट्राच्या राजकारणात कायम चर्चेत असलेलं नाव. आगळेवेगळे आंदोलन करून सरकारची झोप उडविणारे नेते म्हणून प्रशासनात देखील रुबाब आहे. चांदुर बाजार येथे कबड्डी सामने आयोजित करण्यात आलेत. यावेळी बच्चू कडू कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते. दरम्यान आपला आवळता खेळ खेळण्याचा मोह राज्यमंत्री बच्चू कडूंना आवरता आला नाही. त्यांनी चक्क कबड्डीच्या मैदानात उतरून कब्बड्डी खेळण्याचा आनंद लुटला. दरम्यान बच्चू कडू यांनी कबड्डी खेळाडूंचाही उत्साह वाढविला.