ETV Bharat / entertainment

आसाममध्ये रणवीर अलाहाबादियाविरुद्ध तक्रार दाखल, राष्ट्रीय महिला आयोगानं त्वरित कारवाईची केली मागणी... - RANVEER ALLAHBADIA

आसाम पोलिसांनी रणवीर अलाहाबादियाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर, महिला आयोगानं त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Ranveer Allahbadia
रणवीर अलाहबादिया (रणवीर अल्लाहबादिया (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Feb 11, 2025, 10:37 AM IST

Updated : Feb 11, 2025, 11:45 AM IST

मुंबई : समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोच्या एका भागात पालकांबद्दल युट्यूबर-पॉडकास्टर रणवीर अलाहबादियानं केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीचा व्यापक निषेध होत आहे. या प्रकरणात आसाम पोलिसांनी रणवीर अलाहबादियाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. आता राष्ट्रीय महिला आयोगानं (NCW)सोशल मीडिया स्ट्रीमिंग साइट्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवरील अश्लील सामग्रीवर अंकुश लावण्यासाठी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी 10 फेब्रुवारी रोजी सांगितलं की, "ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका शो दरम्यान वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल पोलिसांनी युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादिया यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे."

रणवीर अलाहाबादिया विरुद्ध आसाममध्ये तक्रार दाखल : रणवीर अलाहाबादियासह, इतर चार सोशल मीडिया इन्फ्लुएंसरविरुद्धही तक्रार दाखल केली गेली आहे. हिमंता बिस्वा सरमा यांनी पुढं म्हटलं, "आज 10 फेब्रुवारी रोजी गुवाहाटी पोलिसांनी आशिष चंचलानी 2. जसप्रीत सिंग 3. अपूर्वा मखीजा 4 रणवीर अलाहबादिया 5. समय रैना आणि इतर काही इंफ्लूएंसरविरोधात एफआयआर दाखल केली. 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देण्याचा आणि चर्चा केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. याप्रकरणी तपास अजूनही सुरू आहे." युट्यूबर-सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अलाहबादियानं समय रैनाच्या शोमध्ये पालकांबद्दल आक्षेपार्ह टिप्पण्या केल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं.

महिला आयोगानं लिहिलं पत्र : इन्फ्लुएंसर रणवीर अल्लाहबादियाच्या असा वादग्रस्त विधानमुळे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांना एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी कठोर सेन्सॉरशिप आणि कंटेंट मॉडरेशन सिस्टम लागू करण्याची गरज अधोरेखित केली आहे. दरम्यान 'इंडियाज गॉट टॅलेंट' या शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं एका स्पर्धकाला पालकांशी संबंधित प्रश्न विचारला, त्यानंतर बराच गोंधळ उडाला. या शोमधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर सोशल मीडिया यूजर्सनं रणवीर अलाहाबादियाच्या या आक्षेपार्ह टिप्पणीवर निषेध व्यक्त केला. वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, रणवीर अलाहाबादियानं त्यांच्या अयोग्य टिप्पण्यांसाठी माफी मागितली.

हेही वाचा :

  1. 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमध्ये 'अपमानास्पद' टिप्पणी केल्याबद्दल युट्यूबर रणवीर अलाहबादियाविरुद्ध पोलीस खटला दाखल...
  2. 'मला माफ करा म्हणत', रणवीर अलाहाबादियानं पोस्ट केला व्हिडिओ, कारवाईच्या भितीनं सूचली उपरती
  3. अमिताभ बच्चनलाही खळखळून हसवणाऱ्या समय रैनावर कारवाईची टांगती तलवार?

Last Updated : Feb 11, 2025, 11:45 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.