हैदराबाद : एनपीसीआयनं फास्टॅगसाठी नवीन नियम लागू केले आहेत. टोल प्लाझावर टॅग स्कॅनकण्यापूर्वी 60 मिनिटे किंवा 10 मिनिटं टॅग काळ्या यादीत राहिल्यास, पैसे कट होणार नाहीय. या नियमानुसार वापरकर्त्यांना त्यांचं FASTag स्टेटस दुरुस्त करण्यासाठी 70 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.
नवीन फास्टॅग नियम लागू
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं (एनपीसीआय) द्वारे फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम लागू केले आहेत. 17 फेब्रुवारी 2025 पासून नवीन फास्टॅग नियम लागू होणार आहे. यामध्ये, वापरकर्त्याला त्यांच्या फास्टॅग स्थितीबद्दल अधिक सक्रिय राहण्याची आवश्यकता आहे. कारण तुमचं फास्टॅग सक्रीय नसल्यास तुमचं पेमेंट अडकू शकतं. त्यामुळं तुम्हाला नाहक मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता असते.
फास्टॅगचं नवीन नियम काय?
एनपीसीआयनं 28 जानेवारी 2025 रोजी नियम जारी केले आहेत, त्यानुसार, 17 फेब्रुवारी 2025 पासून, टोल प्लाझावर टॅग स्कॅन कोण्यापूर्वी 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टॅग ब्लॅकलिस्टमध्ये असेल तर किंवा टॅग स्कॅन झाल्यानंतर किमान 10 मिनिटे ब्लॅकलिस्टमध्ये असेल, तर पैसे दिले जाणार नाहीत. या नवीन नियमामुळं वापरकर्त्यांना त्यांचं FASTag स्टेटस सुधारण्यासाठी 70 मिनिटांचा कालावधी मिळतोय.
FASTag नियमांमधील बदलाचा काय परिणाम होईल?
FASTag नियमांमधील बदलाचा थेट परिणाम वापरकर्त्यावर होईल. आता शेवटच्या क्षणी टोल बूथवर ब्लॅकलिस्टेड FASTag रिचार्ज केल्यानं तुमचं नुकसान होऊ शकतं. जर तुम्ही टोलवर पोहोचता, तेव्हा तुमचा FASTag आधीच ब्लॅकलिस्टेड असेल, तर लगेच रिचार्ज केल्यानं पेमेंट होणार नाही.
FASTag ब्लॅकलिस्ट स्टेटस कसं तपासायचं
- परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- "ई-चालान स्टेटस तपासा" किंवा तत्सम पर्याय निवडा.
- तुमचा वाहन नोंदणी क्रमांक प्रविष्ट करा.
- अशा प्रकारे तुम्हाला तुमचं वाहन ब्लॅकलिस्टेड आहे, की नाही हे कळेल.
FASTag कसं अनब्लॉक करायचं
- प्रथम, FASTag रिचार्ज करा. त्यानंतर, किमान शिल्लक ठेवा.
- नंतर पेमेंटची पडताळणी करा.
- यानंतर, FASTag ची स्थिती कळेल.
- काही वेळातच FASTag सक्रिय होईल.
हे वाचलंत का :