ETV Bharat / state

मुलाला परत आणण्याकरिता तानाजी सावंत यांच्याकडून सत्तेचा गैरवापर-सुषमा अंधारे यांचा आरोप - TANAJI SAWANT

माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सत्तेचा दुरुपयोग करत मुलाला विमानानं परत आणल्याची टीका शिवसेना (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

Tanaji Sawant son news
तानाजी सावंत मुलगा अपहरण तपास (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2025, 8:22 AM IST

Updated : Feb 11, 2025, 10:26 AM IST

पुणे- माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा ऋषिराज सावंत यांच्या मुलाला चार्टड विमानानं सुखरुप पुण्यात आणलं आहे. मात्र, माजी मंत्री सावंत यांनी खोटा गुन्हा दाखल करून मुलाला परत आणलं असल्याची टीका शिवसेना (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.

शिवसेना (यूबीटी) नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या," आमदार तानाजी सावंत यांच्या मुलाच्या अपहरणाची बातमी ऐकल्यानंतर मला धक्का बसला. मंत्र्याची मुलं जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य कुटुंबातील मुलांच्या सुरक्षिततेचं काय? अस एक विचार मनात आला. पण, समोर आलेली माहिती धक्कादायक आहे. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झालंच नव्हतं. तर तो मुलगा घरात भांडण करुन निघून गेला होता. त्या मुलाला अडवायचं आहे, म्हणून त्यांनी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. पैसा आणि सत्ता यांचा गैरवापर करत खोटा अपहरणाचा गुन्हा दाखल करुन मुलाला परत आणलं. म्हणजे पैसा असणाऱ्यांना चटकन न्याय देण्यासाठी यंत्रणा तयार होतात. कसे रेट कार्पेट टाकलं जातं? पण, एरवी गोरगरीब माणसांच साधं तक्रार अर्ज देखील घेतले जातं नाहीत."

सुषमा अंधारे यांची तानाजी सावंत यांच्यावर टीका (Source- ETV Bharat)

पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे खासगी विमान परतले- सोमवारी दुपारच्या सुमारास माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत हा त्याचे मित्र प्रवीण उपाध्या आणि संदीप वासेकर यांच्यासोबत बजाज एव्हिएशनच्या फाल्कन 2000 एलएक्स नावाच्या खासगी विमानानं बँकॉकला जायला निघाले. तानाजी सावंत यांच्या मुलाचं अपहरण झाल्याची माहिती चार वाजण्याच्या सुमारास पोलीस कंट्रोल रुमला माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी सर्व टीम कामाला लावली. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं ऋषिराज सावंतला बँकॉकसाठी घेऊन जाणारे विमान पुण्यात परतले.

प्राथमिक माहितीनुसार गुन्हा दाखल- याबाबत पोलीस उपायुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले, "कोणीतरी त्याचं अपहरण केल्याची सुरुवातीला माहिती मिळाली. त्या आधारावर तक्रार दाखल केली आहे. पुढे तपासात जशी माहिती येईल, त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. कोणीतरी त्याला (ऋषिराज सावंत) घेऊन गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्याशिवाय पुढील कारवाई होत नव्हती."

माजी मंत्री सावंत काय म्हणाले?- मुलासोबात वाद झाल्यानं मुलगा निघून गेला होता का? असं माजी मंत्री तानाजी सावंत यांना विचारलं असता ते म्हणाले, "माझा मुलगा तीस वर्षांचा झाला आहे. आमच्यात कधीही वाद झाले नाही. रात्री आम्ही एकत्रित बसलो बोललो. पहाटे रुद्राभिषेकदेखील केला. न सांगता गेल्यानं पोलिसांना सांगितल. आता त्याच्यासोबत बोलल्यावर का गेला? याबाबत माहिती घेणार आहे. बाप म्हणून जे काही करता येईल, ते केलं आहे," असेही माजी मंत्री सावंत सांगितलं.

हेही वाचा-

  1. Boyfriend Kidnap Girlfriend : अल्पवयीन गर्लफ्रेंडचं ट्रेनमधून अपहरण; बॉयफ्रेंड साताऱ्यातून ताब्यात
  2. प्रायव्हेट चार्टर्डनं बँकॉकला निघाला होता तानाजी सावंतांचा मुलगा; पुण्यात परतला

Last Updated : Feb 11, 2025, 10:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.