पंतप्रधानांनी महिलांची माफी मागावी; अन्यथा महिला काँग्रेस रस्त्यावर आंदोलन उभारणार- महिला काँग्रेसच्या अध्यक्षा - महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे
🎬 Watch Now: Feature Video
यवतमाळ - समाज माध्यमावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या व्हीडिओमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या मुखातून "बेटी बचाव, बेटी पटाओ" अशा प्रकारचे वक्तव्य निघाल्याचे दिसून येत आहे. या वक्तव्यामुळे महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या महिला संतप्त झाल्या आहेत. त्यांनी मोदींच्या या वक्तव्याचा निषेध केला. जे तुमच्या मनात आहे, तेच मुखातून बाहेर येत असल्याचा त्यांनी आरोप केला. पंतप्रधान मोदींनी महिलांची माफी मागावी. अन्यथा या प्रकरणी महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांनी दिला आहे.