राज्यात पूर्ण बहुमताने महायुतीचे सरकार येणार -महादेव जानकर
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक नेता आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जोर लावत आहे. याच पार्श्वभूमीवर रासप नेते महादेव जानकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी चर्चा केली. यावेळी बोलताना महादेव जानकर यांनी महायुतीचे 225 उमेदवार निवडणून येतील, असा विश्वास व्यक्त केला.