ETV Bharat / politics

जाणून घ्या, का आहेत देवेंद्र फडणवीस 'विक्रमादित्य'?

भाजपा नेते देवेंद्र फडणवीस हे 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदान येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. यानिमित्ताने त्यांच्या नावावर काही विक्रमांची नोंद होणार आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 9 hours ago

Updated : 5 hours ago

मुंबई : होणार, होणार म्हणून ज्या निर्णयाची प्रतीक्षा महाराष्ट्रातील जनता करत होती, तो निर्णय अखेर जाहीर झाला. भाजपा कोअर कमिटीच्या बैठकीत विधिमंडळाचे नेते पर्यायाने राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या भाजपाच्या महाराष्ट्रातील निरीक्षकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

विक्रमाचे 'इंद्र' देवेंद्र : संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात दिवंगत वसंतराव नाईक वगळता कोणत्याही नेत्याला न जमलेली कामगिरी देवेंद्र फडणवीस यांनी करुन दाखवली आहे. 2019 च्या राजकीय अस्थिर वातावरणात काही तासांचे मुख्यमंत्री राहण्याचा नकोसा विक्रम नावावर करण्यापूर्वी त्यांनी 2014 ते 2019 असा मुख्यमंत्रिपदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. आतापर्यंत दिवंगत वसंतराव नाईक यांनाच 1962 ते 1967 दरम्यान मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करता आला होता. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बॅरिस्टर ए आर अंतुले, मनोहर जोशी या दिवंगत नेत्यांसह शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनाही ही किमया साधता आली नव्हती. कोणत्या न कोणत्या कारणाने या सर्व नेत्यांना मुख्यमंत्रिपद सोडावं लागलं होतं. शिवाय मराठा समाजाचं राजकीय प्राबल्य असलेल्या महाराष्ट्रात दिवंगत मनोहर जोशी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजाचे एकमेव मुख्यमंत्री आहेत.

List of Deputy Chief Ministers of Maharashtra
महाराष्ट्राच्या आजवरच्या उपमुख्यमंत्र्यांची यादी (GFX)

साखळी तोडली : या निमित्ताने आणखी एक अनोखा विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जमा झाला आहे. 1978 पासून 2024 पर्यंत महाराष्ट्रात 10 उपमुख्यमंत्री झाले. यातल्या एकाही उपमुख्यमंत्र्याला आतापर्यंत आपल्या पदासमोरचं 'उप' काढून मुख्यमंत्री बनण्यात यश लाभलं नाही. राज्याचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अख्खी शिवसेनाच आपल्याबरोबर आणल्यानंतर सत्तास्थापनेच्या वेळेस 105 जागांवर विजय मिळवलेल्या भाजपाचाच मुख्यमंत्री होणार आणि ते नाव देवेंद्र फडणवीस यांचंच असणार, हे निश्चित मानलं जात होतं. मात्र भाजपाने धक्कातंत्राचा वापर करत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपदावर बसवलं आणि आधी मुख्यमंत्री म्हणून प्रशासनाचा गाडा कुशलतेने हाकणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले. फडणवीस यांनी अनिच्छेने ते पद स्वीकारलं. तेव्हापासून म्हणजे 2022 ते नोव्हेंबर 2024 पर्यंत फडणवीस उपमुख्यमंत्री राहिले. कदाचित भविष्यात नवं प्रमोशन घेऊन 'पुन्हा येईन' याचा अंदाजही फडणवीसांना आला नसेल.

विक्रमांची मालिका तरुणपणातच सुरू : शिवाय वयाच्या 44 व्या वर्षी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे शरद पवार यांच्यानंतर सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून नागपूरमध्ये राजकीय प्रवास सुरू केल्यानंतर वयाच्या 22 वर्षी ते सर्वात कमी वयाचे नगरसेवक आणि 27 व्या वर्षी सर्वात कमी वयाचे महापौर बनले. राजकीय कारकिर्दीत विक्रमांची मालिका रचणाऱ्या फडणवीस यांच्या विक्रमांचा पाया खऱ्या अर्थाने तेव्हाच रचला गेला.

काही वर्षांनी फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा : आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपद भूषवण्याची संधी मिळाल्यानंतर काही वर्षांनी फडणवीस केंद्रात जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याविषयी काही विचारल्यास संघाकडून शिकलेली 'शिस्त' दाखवत फडणवीस पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास आपण कटिबद्ध असल्याचं सांगतात. कोण जाणो? पुढच्या प्रवासात केंद्रात महाराष्ट्राच्या बाबतीत आजपावेतो कुणीही न गाठलेली मोठी राजकीय मजल गाठण्याचा विक्रम त्यांना खुणावत असेल.

हेही वाचा -

  1. देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा, एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीवर प्रश्नचिन्ह कायम
  2. 25 वर्षांत ठाकरेंचा बालेकिल्ला पहिल्यांदाच उद्ध्वस्त, आगामी निवडणुका असणार आव्हानात्मक
  3. "शिंदेंचं संध्याकाळपर्यंत समजेल, पण मी शपथ घेणार", अजित पवारांच्या विधानानंतर शिंदे म्हणतात...

Last Updated : 5 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.