मारकडवाडी येथील बॅलेट पेपरवरील मतदान प्रक्रिया रद्द; काय म्हणाले उत्तम जानकर? पाहा व्हिडिओ - UTTAM JANKAR ON BALLOT ELECTION

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 3, 2024, 11:43 AM IST

सोलापूर : विधानसभा निवडणुकीमध्ये (Maharashtra Assembly Election 2024) ईव्हीएम मशीनद्वारे मतदानाचा घोळ झाल्याचा आरोप माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी केलाय. याच पार्श्वभूमीवर आज (3 डिसेंबर) मारकडवाडी गावात अभिरुप बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडणार होती. यासाठी ग्रामस्थांनी गावामध्ये पाच बूथ निर्माण करुन मतदान केंद्रावर मतदान पेट्या, शिक्के, मतपत्रिका हे सर्व साहित्य आणलं होतं. मात्र, पोलीस प्रशासनानं गावात जमावबंदी लागू असताना जर मतदान झालं तर लोकांवर गुन्हे दाखल होतील, असा इशारा दिला. तसंच यानंतर जे काही घडेल याची पूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार उत्तम जानकर यांची असेल, असंही पोलीस म्हणाले. पोलिसांच्या इशाऱ्यानंतर ही मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली. मात्र, असं असली तरी आम्ही न्यायालयीन लढा लढू, असं जानकर म्हणालेत. 

ABOUT THE AUTHOR

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.