वाढता कोरोना! पुण्यातील तुळशीबागेतील गर्दी कमी; तर व्यवसायावर झाला परिणाम - less crowd in tulsibag pune news
🎬 Watch Now: Feature Video
पुणे - शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. कोरोनाच्या वर्षभरात पुण्यात काल सर्वाधिक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. सातत्याने वाढ होत असलेल्या रुग्णसंख्येमुळे पुणे शहराच्या मध्यभागी असलेल्या तुळशीबागेत पुणेकरांची होणारी गर्दी कमी झाली आहे. दररोज गजबजलेल्या तुळशीबागेत कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे अतिशय तुरळक अशी गर्दी पाहायला मिळत आहे. कमी झालेल्या गर्दीचा फटका तुळशीबागेतील 650 हुन अधिक दुकानदारांना बसला असून केवळ 20 टक्केच धंदा होत असल्याचे तुळशीबागेतील व्यापारी सांगत आहे. याबाबत 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधीने घेतलेला आढावा.