VIDEO : आम्ही शिवसैनिक आहोत, संयम अन् शांततेत काम करतो - सुनील शिंदे - विधान परिषद निवडणूक
🎬 Watch Now: Feature Video
विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिंदे मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, मुंबईचे महापौर किशोरी पेडणेकर, आमदार अजय चौधरी, नगरसेवक आशिष चेंबूरकर आदि शिवसेनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.यावेळी सुनिल शिंदे म्हणाले की, विधान परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल की नाही, हे आता सांगता येणार नाही. शिवसैनिकांना लढण्याची सवय आहे. लढ्यातून मिळालेलं यश खूप मोठं असतं. उद्धव ठाकरे यांनी सामान्य माणसाला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आदित्य ठाकरे यांच्या सोबत वॉर्ड मध्ये काम करता येणार आहे. संयम, निष्ठा अंगी असावी लागते. घाई गर्दी नुकसान करणारी आहे. आम्ही शिवसैनिक आहोत, संयम आणि शांततेत काम केले आहे. जिथे अन्याय होतो तिथे, शिवसैनिक उठून उभा राहतो. पक्षांतर्गत घेतले जाणारे निर्णय विचारपूर्वक असतात. त्यापैकी मी एक आहे.