कांदिवली पोलिसांनी केली दोन सराईत चोरांना अटक - मुंबई शहर बातमी
🎬 Watch Now: Feature Video
मुंबई - कांदिवली पोलिसांनी दोन सराईत चोरांना अटक केली आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला धक्का मारून त्याच्या भांडण करायचे. त्याच दरम्यान त्यांचा मोबाइल चोरून पसार व्हायचे. याप्रकरणी पोलिसांनी कामरान जावेद सैयद ( वय 24 वर्षे) व चांद खाजा शेख उर्फ कल्या (22 वर्षे) या दोघांना अटक केली आहे. त्यांनी कांदिवली पश्चिम स्विमिंग पुलाजवळ बाबूभाई मावजी गोहिल (वय 77 वर्षे) हे रस्त्याने जात होते. त्यावेळी आरोपी तेथे आले आणि त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसोबत भांडण सुरू करून धक्काबुक्की केली. त्याच दरम्यान बाबूभाई यांचा फोन घेऊन फरार झाले. हा सर्व प्रकार तेथे असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यानुसार कांदिवली पोलिसांनी या चोराकडून 11 मोबाईल फोन हस्तगत केले आहेत.