१२५ मॅट्रिक टॅन क्षमता असलेला जम्बो ऑक्सिजन टॅंक नागपूरमध्ये दाखल - 125 Metric ton capacity Oxygen Tank
🎬 Watch Now: Feature Video
नागपूर - कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा आणखी बळकट व्हावी या उद्देशाने मूलभूत सुविधा उभारण्यावर भर दिला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठा तुटवडा सहन करावा लागला होता, त्यामुळे भविष्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहावा यासाठी १२५ मेट्रिक टन साठवणूक क्षमता असलेला लिक्विड मेडिकल ऑक्सिजन स्टोरेज जम्बो टॅंक नागपुरात दाखल झाला आहे. स्टोरेज टँक मनो रुग्णालयाच्या परिसरात बसविण्यात येणार आहे. अमरावती मार्गे हे ऑक्सिजन टँक नागपुरात दाखल झाले. ऑक्सिजनची साठवणूक करण्यासाठी तयार करण्यात आलेले हे टॅंक १३ तारखेला चेन्नई वरून निघाले होते. सुमारे सात दिवसांचा प्रवास करून टॅंक आज नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. जम्बो ऑक्सिजन टॅंक २० मीटर उंच आणि ४० टन वजनाचे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा देशातील सगळ्यात मोठा ऑक्सिजन स्टोरेज टॅंक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.