जनता कर्फ्यूमुळे इतिहासात पहिल्यांदाच रामकुंड परिसर निर्मनुष्य...
🎬 Watch Now: Feature Video
नाशिक - जनता कर्फ्यूमुळे इतिहासात पहिल्यांदाच धार्मिक भाग असलेला रामकुंड परिसर निर्मनुष्य झाल्याचे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी सांगितले आहे. जनता कर्फ्यूला नाशिककरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत शंभर टक्के बंद पाळला. नाशिकची ओळख धार्मिक आणि आध्यत्मिक शहर म्हणून आहे. शहरातील पंचवटी परिसरात देशभरातून रोज हजारो भाविक धार्मिक विधी करण्यासाठी येत असतात. मात्र, रविवारी जनता कर्फ्यूमुळे इतिहासात पहिल्यांदाचं रामकुंड परिसर निर्मनुष्य झाल्याचे पाहायला मिळाले.