जळगाव वसतिगृह प्रकरण : सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू - जळगाव महिला वसतिगृह प्रकरण
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-10860149-thumbnail-3x2-final.jpg)
जळगाव - येथील एका महिला वसतिगृहात काही पोलीस कर्मचारी व इतर बाहेरच्या पुरुषांकडून मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सामाजिक संघटनांनी मंगळवारी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यात संबंधित कृत्याचा व्हिडिओही सादर केला. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्याचे आश्वासन दिले. यानंतर तक्रारदारांसह संबधितांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली आहे. तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू झाली आहे.