ST Workers Strike : अंगावर फुले फेकून जळगावातील एसटी कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन - ST Workers Ultimatum Update

🎬 Watch Now: Feature Video

thumbnail

By

Published : Dec 13, 2021, 9:17 PM IST

Updated : Dec 14, 2021, 7:13 AM IST

जळगाव आगारात कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत शासनाने दिलेल्या शेवटच्या अल्टिमेटमचे अनोखे आंदोलन करत स्वागत केले. ( Jalgaon ST Workers ) जळगाव - मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सेवेत रुजू होण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. ( Ultimatum to ST Workers ) जळगाव आगारात कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत शासनाने दिलेल्या शेवटच्या अल्टिमेटमचे अनोखे आंदोलन करत स्वागत केले. ( Jalgaon ST Workers ) काय म्हणाले एसटी कर्मचारी? राज्यातील अनोखे आंदोलन सोमवारी जळगाव आगारात करण्यात आले. मेस्माची कारवाई असो की निलंबनाची कारवाई आम्ही कारवाईला घाबरत नाही. शासनाने कारवाई करत राहावे आम्ही या कारवाईचा फुलांप्रमाणे स्वीकार करू, असे म्हणत जळगाव आगारातील कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या हाताने स्वत:च्या अंगावर फुलांचा वर्षाव करत अनोखा पध्दतीने कारवाईचा निषेध व्यक्त केला. शासनाने बस कर्मचाऱ्यांना सेवेत हजर होण्यासाठी शेवटचा अल्टिमेटम दिला आहे. यापूर्वीही अनेक कारवाईचे आदेश आले. मात्र, त्यानंतरही कर्मचारी संपावर तसेच त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. आज जळगाव आगारात संपकरी बस कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या हाताने स्वत:वर फुलांचा वर्षाव करत अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले. शासनाने कितीही कारवाई केली तरीही आम्ही त्याला घाबरत नाही आणि जोपर्यंत एसटी विभागाच्या शासनात विलिनीकरण होणार नाही, तोपर्यंत मागण्यांवर तसेच आंदोलनावर ठाम असल्याचंही कर्मचार्‍यांनी बोलताना सांगितले. हेही वाचा - ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटावा यासाठी परिवहनमंत्री अनिल परब शिर्डी साईचरणी
Last Updated : Dec 14, 2021, 7:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.