विशेष मुलाखत : 'खासगी रुग्णालयांनी जास्त पैसे आकारल्यास थेट कारवाई करू' - राजेश टोपे मुलाखत
🎬 Watch Now: Feature Video
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा विळखा घट्ट होत असताना प्रशासन आणि सरकारकडून होत असलेल्या उपाययोजना, रुग्णालयांची सद्यस्थिती, उपचार आणि बेड्सची उपलब्धता यासंबंधी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील परिस्थितीविषयी सविस्तर माहिती दिली असून खासगी रुग्णालयांना थेट इशारा दिला आहे. रुग्णांकडून अमाप पैसे उकळल्यास कारवाईचे निर्देश दिले आहेत. यासाठी 1916 या क्रमांकावर फोन करून तक्रारी नोंदवण्याचे आवाहनही त्यांनी केले. सध्या राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर (रिकव्हरी रेट) 55 टक्क्यांवर आला आहे, असे टोपे यांनी सांगितले. फडणवीस यांच्या आरोपांवरही टोपे यांनी स्पष्टिकरण दिले आहे. पाहा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ही विशेष मुलाखत.