ईटीव्ही भारत Exclusive : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची विशेष मुलाखत... - Industrial Minister Subhash Desai Interview
🎬 Watch Now: Feature Video
![ETV Thumbnail thumbnail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/320-214-7424377-thumbnail-3x2-subashdesai.jpg)
सध्या जगभरातले विविध देश कोरोनाशी झुंज देत आहेत. आरोग्याशी निगडित उद्योग आणि सेवा वगळता इतर सर्वच उद्योगधंद्यांना कोरोनाचा फटका बसला आहे. आपल्या देशाचा विचार करायचा झाल्यास मुंबई ही आपली आर्थिक राजधानी, मात्र कोरोनामुळे अनेक छोट्या-मोठ्या उद्योगांवर संक्रांत आली आहे. २४ मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनचा आता पाचवा टप्पा १ जूनपासून सुरू होतोय. या साधारणत: दोन महिन्यांच्या कालावधीत, एकूणच उद्योगधंद्यांची काय स्थिती आहे, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई...