Shirdi Dutt Jayanti Ceremony : शिर्डीत दत्तनामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला.. भाविकांचीही मोठी गर्दी - दत्त मंदिर
🎬 Watch Now: Feature Video
शिर्डी (अहमदनगर) - आज दत्त जयंतीचे निमित्त आणि शनिवार रविवारची सुट्टी सलग असल्याने भाविकांची शिर्डीत मोठी गर्दी झालेली पाहण्यास मिळत ( Shirdi Dutt Jayanti Ceremony ) आहे. आज सर्वत्र दत्त जन्म उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातोय. शिर्डीच्या साईबाबा मंदीरातही ( Shirdi Sai Baba Mandir ) हा उत्सव मोठ्या श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. दत्तजयंती निमित्ताने दिल्लीच्या साईभक्तांच्या ( Delhi Sai Devotee ) देणगीतून मंदिराचा गाभारा आणि परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आलाय. आज सांध्यकाळी 6 वाजता श्रीदत्तजन्माचा उत्सव साई मंदिरात साजरा करण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून चालत आली आहे. साईबाबांना श्रीदत्त अवतार मानतात. या पावन दिवशी साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक मोठ्या प्रमाणात येतात. आज दिवसभर साईसमाधीवर भगवान दत्तात्रयांचा फोटो ठेऊन त्याची पूजा केली जाते. आज सकाळपासून साईबाबांच्या मूर्तीला सुवर्ण अलंकार घालण्यात आलेत. शिर्डी साईबाबा समाधी मंदिर तसेच चावडी, द्वारकामाई, गुरूस्थान, साई मंदिर परिसरातील दत्त मंदिर, विविधरंगी फुलांनी सजवण्यात आलेय. दिल्लीचे साईभक्त रजनी डेंग यांनी ह्या फुलांच्या सजावटीचा खर्च केलाय.