पुण्यात आणखी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह, रुग्णांची संख्या पाचवर - नायडू रुग्णालय कोरोना रुग्ण
🎬 Watch Now: Feature Video

दुबई येथून परत आलेल्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 5 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे.