Two Women Prepared For Marriage: नागपुरातील दोन तरुणींनी केली समलैंगिक लग्नाची तयारी - Both of them will get married
🎬 Watch Now: Feature Video
नागपुरातील दोन तरुणींनी धाडसी निर्णय (A bold decision by two young women) घेत उर्वरित आयुष्य एकमेकांच्या सहवासात घालवण्याचे (Spending the rest of life with each other) ठरवले आहे. त्यांनी रीतसर साक्षगंधही उरकला आहे. येत्या काही दिवसांमध्ये या दोघी विवाह बंधनात अडकतील. (Both of them will get married) डॉ सुरभी मित्रा आणि पारोमिता मुखर्जी असे या दोन्ही तरुणींचे नाव आहे. समलैंगिक लग्नाला सध्यातरी आपल्या समाजाने खुल्या मनाने स्वीकारले नसले तरी या दोन्ही तरुणींच्या कुटुंबियांनी त्यांच्या निर्णयाचा मान राखत लग्नाला परवानगी दिली आहे.