Corona Bulletin : राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा - राज्यातील कोरोना संदर्भातील घडामोडींचा वेगवान आढावा
🎬 Watch Now: Feature Video

राज्यात कोरोनग्रस्तांची वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय झालेला आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ८३३३ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने निर्णय घेत अनेक जिल्ह्यांत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना सुरु आहेत. त्याचबरोबर नागरिकांनी सॅनिटायझेशन, योग्य शारीरिक अंतर राखणे आणि वेळोवेळी हात धुण्याची त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले जात आहे.