वाशिम : अवकाळी पावसाच्या गारपिटीने शेकडो पोपट मृत्युमुखी
🎬 Watch Now: Feature Video
वाशिम - शहरासह ग्रामीण भागात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसासोबत अचानक गारपीट झाल्याने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ पिंपळाच्या वृक्षावर वास्तव्यास असणारे शेकडो पोपट मृत्युमुखी पडले. तर अनेक पक्षी जखमी झाले आहेत. त्यामुळे पक्षीमित्रांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमी पोपटांना पक्षी मित्रांकडून उपचारासाठी नेण्यात आले आहे.